महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० डिसेंबर । India vs Bangladesh ODI Series : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी चितगाव येथे खेळला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. बांगलादेशने अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत विजयासह मालिका संपवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल या सामन्यात कर्णधार असणार आहे.
भारताला यावर्षी दुसऱ्यांदा वनडे मालिकेत क्लीन स्वीप टाळायचा आहे. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांच्या मालिकेत त्याचा 3-0 असा पराभव झाला होता. त्याआधी, 2020 मध्ये न्यूझीलंडने त्यांच्या घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 3-0 ने पराभव केला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होईल?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरी वनडे 10 डिसेंबरला चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ :
केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.