महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । Cristiano Ronaldo In Tears : फिफा विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालच्या संघाचा मोरोक्कोसमोर पराभव झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा धक्का बसला आहे. हा पराभव त्याला सहन झाला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि रडू लागले. पराभवानंतर त्याचा रडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रोनाल्डो रडताना दिसत आहे. रोनाल्डोचा रडण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहतेही रडू लागतील. ‘सुपरस्टार’ ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचे जगज्जेतेपदाचे प्रयत्न उधळून लावताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकी देश बनण्याचा पराक्रम साधला.
It hurts me to see Ronaldo like this man 💔 pic.twitter.com/MbRGnTcRO2
— WolfRMFC (@WolfRMFC) December 10, 2022
मोरोक्कोने अल थुमामा स्टेडियमवर झालेली उपांत्यपूर्व लढत १-० फरकाने जिंकली. ४२ व्या मिनिटास २५ वर्षीय युसूफ एन-नेसिरी याचे प्रेक्षणीय हेडिंग सामन्यात निर्णायक ठरले. सहाव्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या मोरोक्कोने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मोरोक्कोच्या झुंजार खेळामुळे पोर्तुगालला तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठणे शक्य झाले नाही. मोरोक्कन गोलरक्षक यासिन बोनो याची गोलनेटसमोर कामगिरी परत एकदा अभेद्य ठरली.
आठ मिनिटांच्या इंज्युरी टाईममधील तिसऱ्या मिनिटास वालिद शेदिरा याला रेड कार्ड मिळाले. एक खेळाडू कमी झाला, पण झुंजार मोरोक्कोने आघाडी निसटू दिली नाही. सामन्यातील अखेरचे मिनीट बाकी असताना पोर्तुगालच्या पेपे याचे हेडिंग हुकले आणि मोरोक्कोच्या आणखी एका ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झाले.
एन-नेसिरीचे भेदक हेडिंग विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना युसूफ एन-नेसिरी याचे हेडिंग भेदक ठरले. त्याचा हा गोल मोरोक्कोतर्फे विक्रमी ठरला.