महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ डिसेंबर । 14 जानेवारी 2000 ला हा सामना झाला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी भारताला सुरुवातीलाच मॅकग्राने मोठे धक्के दिले होते. पहिल्या 11 षटकांच्या आतच मॅकग्राने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गजांना बाद करत माघारी धाडले होते. 11 षटकात भारताला 20 धावा देखील करता आल्या नव्हत्या.
त्या सामन्यात मॅकग्राने गोलंदाजी करताना चेंडूची दिशा आणि टप्पा इतका अचुक ठेवला होता की भारतीय फलंदाजांना त्याच्या विरुद्ध धावाच करता येत नव्हत्या. त्याने सचिन, गांगुली आणि लक्ष्मणला बाद केल्यानंतर 33 व्या षटकात समिर दिघेलाही बाद केले.
त्या संपूर्ण सामन्यात मॅकग्राने 10 षटके गोलंदाजी टाकताना केवळ 8 धावा दिल्या होत्या आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या. एवढेच नाही तर तब्बल 53 चेंडू मॅकग्राने निर्धाव टाकले होते. यावरुन समजते की मॅकग्राने त्या सामन्यात किती टीचून आणि सातत्यपूर्ण गोलंदाजी केली होती.