Gold Silver Price: सोने दरात मोठी तेजी ; पाहा नवीन दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ डिसेंबर । सोने दरात सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. नव्या वर्षात सोनं 64 हजारांवर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मागच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याचे दर 56 हजारपेक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. सोनं खरेदीसाठी त्यामुळे सराफा दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येतेय. एकीकडे शेअर बाजारात पडझड झालेली पाहायला दिसतेय, तर दुसरीकडे लोकांचा कल सोने खरेदीकडे दिसतोय.

देशात सोने-चांदीच्या किमती सतत वाढत आहेत. बुधवारी सराफा बाजार सुरु तेव्हा सोन्याचा भाव 54,770 रुपये प्रति तोळा होता, दिवसभरात 54,890 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. दुसरीकडे, चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ते 68,866 रुपये प्रति किलोने सुरु झाले. दिवसभरात 69,070 रुपये प्रति किलोपर्यंत भाव पोहोचला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीत घसरण
आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोने दर (Gold Price) सध्या लाल चिन्हावर ट्रेंड करत आहे आणि या थोडी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोनेच्या किमतीत 0.04 टक्क्यांनी घसरण झाली, त्यामुळे सोने प्रति औंस 1809 डॉलरवर व्यवसाय करताना दिसले.

चांदीच्या दरातही किंचित घट
त्याचप्रमाणे बुधवारी चांदीच्या दरात आदल्या दिवशीच्या तुलनेत 0.13 टक्क्यांची घसरण दिसून आली. बुधवारी चांदीचा भाव 23.68 डॉलर प्रति औंस राहिला. गेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किमतीत 2.17 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी चांदीच्या दरात 9.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बुधवारी सोने-चांदीच्या दरात वाढ
दुसरीकडे, जर आपण भारतीय सराफा बाजाराबद्दल बोल्यायचे म्हटले तर, किरकोळ चढउतार असूनही, ते अजूनही उच्च किंमतीवरच आहे. मंगळवारी दिल्लीत सोने दरात प्रति ग्रॅम 8 रुपयांची घट नोंदवण्यात आली, ज्यामुळे सोनेचा दर प्रति तोळा 54,542 रुपयांवर बंद झाला. त्याचवेळी, चांदीच्या दरात वाढ दिसून आली आणि तो 82 रुपयांनी वाढून 68267 रुपये प्रति किलोवर पोहोचला. मात्र बुधवारी या सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ दिसून आली आणि तो नव्या उंचीवर बंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *