महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ डिसेंबर । रिझर्व्ह बँका ऑफ इंडिया दर महिन्याला सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 2023 सालच्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये एकूण 14 दिवस बँकांना सुट्ट्या (जानेवारी 2023) असणार आहेत.
जानेवारीत चार रविवार असतात. या दिवशी बँकेत साप्ताहिक सुट्टी असेल. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहणार आहेत. इतकंच नाही तर काही सण आणि खास दिवस यामुळे वर्षाच्या पहिल्या महिन्यात काही दिवस बँका बंद राहणार आहेत.
पुढच्या महिन्यात एखाद्या दिवशी बँक शाखेत जाण्याचाही तुमचा मानस असेल तर आधी सुट्ट्यांची यादी तपासून पाहा. ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाण्याचा निर्णय घेतला असेल, त्या दिवशी बँकेला सुट्टी असावी, असे होऊ नये.
विशेष म्हणजे देशभरातील बँका जानेवारी 2023 मध्ये 14 दिवस बंद राहणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय सुट्ट्या असतात, तर काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक सुट्ट्या असतात. प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी केवळ संबंधित राज्यांमध्ये बँक शाखा बंद असतात.
1 जानेवरी 2023 – रविवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील
2 जानेवरी2023 – मिझोराम इथे नव्या वर्षाच्या सुट्टीनिमित्ताने बँक बंद
11 जानेवरी 2023 – मिशनरी दिवस मिझोराम इथल्या सर्व बँका बंद राहणार आहेत
12 जानेवरी 2023 – स्वामी विवेकानंद जयंती पश्चिम बंगालमधील बँकांना सुट्टी असणार आहे
14 जानेवरी 2023 – महिन्याचा दुसरा शनिवार संपूर्ण देशातील बँका बंद
15 जानेवरी 2023 – रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद
16 जानेवरी 2023 – पाँडिचेरी आणि तामिळनाडूमध्ये बँका बंद राहणार आहेत, तर आंध्र प्रदेशात कनुमा पांडुगाच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.
22 जानेवरी 2023 – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
23 जानेवरी 2023 – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी आसाममधील बँका बंद राहणार आहेत.
25 जानेवरी 2023 – राजत्त्व दिनामुळे हिमाचल प्रदेशातील बँका बंद राहणार आहेत.
26 जानेवरी 2023 – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात बँका बंद राहणार आहेत.
28 जानेवरी 2023 – महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार आहेत.
29 जानेवरी 2023 – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
31 जानेवरी 2023 – आसाममधील बँका मी-दम-मी-फायच्या दिवशी बंद राहणार आहेत.
असं असलं तरी देखील इंटरनेट बँकिंग सेवा सुरू असणार आहे. त्यामुळे अनेक छोटी कामं ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने होऊ शकतात. फक्त सुट्ट्यांमुळे ATM मध्ये खडखडात होऊ शकतो. त्यामुळे पैसे काढून ठेवा नाहीतर नुकसान होऊ शकतं.