Paush Amavasya 2022 : वर्षातील शेवटची अमावस्या आहे खूप खास ; दान केल्यास मिळेल पुण्य…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ डिसेंबर । 23 डिसेंबर 2022 ला हा पौष महिन्यातील अमावस्या आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाचा हा शेवटचा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसापासून शुक्ल पक्ष सुरू होईल. पौष महिन्यातील अमावास्येला स्नान करून तीर्थ दान करण्याची परंपरा आहे. वर्षातील इतर अमावस्यांपेक्षा ही अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते. पितरांनाही या सणात श्राद्ध केल्याने समाधान मिळते. पौष महिन्याची अमावस्या अतिशय शुभ संयोगाने येत आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा विशेष योगायोग आहे. आजच्या लेखात वर्षातील शेवटच्या अमावस्येचे शुभ योग आणि उपाय जाणून घेऊ या.

आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते.

यंदा पौष अमावस्येला शुभ योगायोग कोणते आहेत?

ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी पौष अमावस्येला असा शुभ योगायोग घडत आहे. यामुळे पितरांसह माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास असेल. पौष अमावस्या 23 डिसेंबरला आहे. तर हा दिवस शुक्रवार आहे, तसेच हा दिवस देवी लक्ष्मीलाही समर्पित आहे. या दिवशी केलेले उपाय पितरांसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून दुहेरी लाभ देतात. अमावस्या तिथी 22 डिसेंबरच्या संध्याकाळी 7:13 पासून सुरू होईल आणि 23 डिसेंबर रोजी दुपारी 3:46 पर्यंत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *