2022 मधील राजकारण :7 राज्यांत निवडणुका, 5 ठिकाणी भाजप, तर प्रत्येकी एका राज्यात आप-काँग्रेसची सत्ता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ डिसेंबर । २८ देशांत नवे सरकार… पंतप्रधान मोदींचे नवे घोषवाक्य आणि राहुल यांची यात्रा…२०२२ राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय राहिले. आज जाणून घ्या या वर्षात देश-जगाचे राजकारण कसे राहिले? वर्षातील राजकीय मुद्दे काय होते? कोण यशस्वी ठरले… कोण अपयशी?

गुजरात
भूपेंद्र पटेल- विक्रमी मतांनी जिंकले, दुसऱ्यांदा सीएम बनले

डिसेंबरमध्ये गुजरातेत भाजप नेते भूपेंद्र पटेल पुन्हा मुख्यमंत्री बनले. २०१७ मध्ये पहिल्यांदा विधानसभा लढली होती. १.१७ लाख मतांनी जिंकले होते. पहिल्या कार्यकाळात त्यांना २०२१ मध्ये मुख्यमंत्री बनवले होते. यावेळी ते १.९२ लाख मतांनी जिंकले आहेत.

भाजप नेत्याचा विजयाचा विक्रम

गुजरातमध्ये भाजप नेत्यांनी विक्रम केला. पहिल्यांदा भाजपने एखाद्या राज्यात ८६ टक्के जागा जिंकल्या. भाजपने १८६ पैकी १५६ जागा जिंकल्या. ही राज्याच्या ६२ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाचा सर्वात मोठा विजय होता. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजप सत्तेत आला. भाजपने येथे ५२.२ टक्के मते मिळवली. आप राष्ट्रीय पक्ष बनला आहे.
आपला केवळ ५ जागा मिळाल्या. परंतु त्याहीपेक्षा अधिक पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. आपने येथे सुमारे १३% मते मिळवली. काँग्रेस सर्वाधिक तोट्यात राहिली. ती केवळ १७ जागांवर मर्यादित राहिली. गेल्या निवडणुकीपेक्षा ६० कमी.
उत्तर प्रदेश
योगी आदित्यनाथ पहिल्यांदा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सीएम
मार्चमध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी दुसऱ्या वेळेस भाजप सरकार स्थापन केले. योगी विक्रमी १ लाखांवर मतांनी जिंकले. शेतकरी आंदोलनामुळे भाजपला नुकसान होईल, असे म्हटले जात होते. परंतु हे मुद्दे निष्प्रभ ठरले. एकूण ४०३ जागांपैकी भाजपने २७३ जागा जिंकत ४१.३% मते मिळवली आहेत.

पंजाब
भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री बनले, याच वर्षी विवाह
याच वर्षात पंजाबमध्ये निवडणुका झाल्या. आपने येथे आपसांत भांडत असलेल्या काँग्रेस सरकारला उखडून फेकले. आपला येथे ११७ पैकी ९२ जागा मिळाल्या. राज्यात पहिल्यांदा एखाद्या पक्षाला इतक्या जागा मिळाल्या. आपचे मान १६ मार्च रोजी पंजाबचे सीएम बनले. ४८ वर्षे वयात ७ जुलै रोजी त्यांनी डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी लग्न केले.

बिहार
नितीशकुमार- ८व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी
बिहारात २२ अॉगस्टला नितीश आठव्यांदा सीएम बनले. ९ ऑगस्ट ला एनडीएशी नाते तोडले व राजदसोबत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र
एकनाथ शिंदे- शिवसेनेत बंड करून सीएम बनले
शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे १ जुलै रोजी मुख्यमंत्री बनले. आपला गटच मूळ शिवसेना सांगून भाजपच्या मदतीने सरकार बनवले.

हेही बनले मुख्यमंत्री
उत्तराखंड
पुष्कर सिंह धामी, भाजप

मणिपूर
एन बीरेन सिंह, भाजप.

गोवा
प्रमोद सावंत, भाजप

हिमाचल
सुखविंदर सिंह सुक्खू, काँग्रेस

नवे पद-नवी जागा

मल्लिकार्जुन खरगे : तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला मिळाले बिगर गांधी अध्यक्ष

८० वर्षांचे खरगे शशी थरूर यांना पराभूत करून काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले.१९९८ मध्ये सोनिया गांधींनी पहिल्यांदा काँग्रेसची धुरा सांभाळली होती. पूर्ण २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबीयांऐवजी बाहेरील व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष बनली.

गुलाम नबी आझाद : काँग्रेस पक्ष सोडून स्थापन केला स्वत:चा नवीन पक्ष

२६ ऑगस्टला आपला राजीनामा सोनिया गांधींना पाठवल्यानंतर काँग्रेससोबतची आपली दशकांची जवळीक संपवली. आपल्या पत्रात राहुल गांधी यांच्यावर प्रचंड टीका करत डेमोक्रॅेटिक आझाद पार्टी स्थापन केली.

नवजोत सिद्धू : हत्येच्या ३४ वर्षे जुन्या खटल्यात एका वर्षाचा तुरुंगवास

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष,पंजाबचा मुख्यमंत्री होण्यासाठी दावा करणाऱ्या सिद्धूंना याच वर्षात मेमध्ये एका वर्षाचा कारावास ठोठावला गेला.३४ वर्षे जुन्या रोडरेज प्रकरणात त्यांना शिक्षा झाली. ते सध्या पटियाला कारागृहात आहेत.

प्रशांत किशोर : ३५०० किलोमीटरच्या जन सुराज पदयात्रेला प्रारंभ केला

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबरपासून पश्चिम चंपारण जिल्ह्यातील भितिहारवा येथील गांधी आश्रमापासून ‘जन सुराज’ पदयात्रा सुरू केली. ‘जन सुराज’ पदयात्रा ३,५०० किलोमीटरचे अंतर पार करेल.

घटनात्मक प्रमुख : ६४ वर्षीय मुर्मू सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनल्या

द्रौपदी मुर्मू अशा पहिल्या राष्ट्रपती आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे. शिवाय त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. त्या २५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती झाल्या. या दिवशी त्यांचे वय ६४ वर्षे १ महिना आणि ८ दिवस होते. या पूर्वी हा विक्रम नीलम संजीव रेड्डींच्या नावे होता. ते ६४ वर्षाे २ महिने ६ दिवसांचे असताना राष्ट्रपती बनले होते.

जगदीप धनखड : पहिले ओबीसी उपराष्ट्रपती बनले

११ ऑगस्टला जगदीप धनखड यांच्या रूपाने देशाला पहिल्यांदा ओबीसी समाजाला उपराष्ट्रपतिपद मिळाले. ते १४ वे उपराष्ट्रपती आहेत. धनकड व्यवसायाने वकील होते. यापूर्वी ते प. बंगालचे राज्यापाल राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *