महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राष्ट्र लॉक डाऊन पाळत आहे.शासकीय ठिकाणी देखील अतिशय कमी कर्मचारी कार्य करीत आहे.देशपातळीवर विचार केला तर देशाचे पंतप्रधान सुद्धा सोशल डिस्टनसिंग चे पालन करत व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून विविध राज्यांच्या संपर्कात आहे अशा वेळी जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी बुलढाणा जि.प.कशी मागे कशी राहणार?
त्याच अनुषंगाने आज ग्रामीण विकास यंत्रणेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभागृहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सौ .मनीषाताई पवार होत्या तर मुख्य कार्यकारी अधिकारी शनमुगराजन,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यासह जि. प उपाध्यक्ष सौ.कमलाताई बुधवत,अर्थ व बांधकाम सभापती रियाजखा पठाण,समाजकल्याण सभापती सौ.पूनम राठोड व कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर या सह प्रत्येक तालुक्यातील जि. प.सदस्य पंचायत समितीच्या वि सी सेंटर मध्ये उपस्थित झाले होते.या वेळी मुख्यत्वे कोरोना विषाणूच्या प्रसारावर करावयाच्या विविध बाबीवर चर्चा झाली.