महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड -: देशात कोरोनामुळे परगावी,परराज्यात,जाण्यासाठी बंदी आहे, लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याच्या सीमा सिल असताना व परराज्याततर परवानगीशिवाय प्रवेश बंद असतानाच, जळगाव जामोद येथून ते 2 व्यक्ती मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे 6 मे रोजी कोणत्याही परवानगीशिवाय सहज गेले व परत आले.
जिल्हा ओलांडून जाताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी तर राज्य ओलांडून जायचे असेलतर डीआयजीची परवानगी बंधनकारक आहे. त्यासाठी मेडिकल टेस्ट व ऑनलाइन अर्ज भरणे या सर्व गोष्टी आहेत. विषयाची गंभीरता पाहूनच प्रवेशाची परवानगी मिळते व त्यानंतर अधिकृत पास दिला जातो.
पण 6 मे रोजी पहाटे नातेवाईक वारल्याचा निरोप आल्यानंतर जळगाव जामोद येथील ते दोन जण सकाळीच टू व्हीलरने बऱ्हाणपूरकडे निघाले, ते अशा आडमार्गाने गेले की ज्या मार्गावर पोलीस बंदोबस्तच नाही. म्हणून ते सकाळी सहज गेले व संध्याकाळी परत आलेसुद्धा !
प्रशासनाने जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमा कितीही सील केल्या असल्यातरी, अनेक मार्ग असे आहेत की त्यातून सहज जाता- येता येते. अशा ठिकाणी पोलिसांची नजर असणे आवश्यक आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या चारही बाजूंचे जिल्हे हे जवळजवळ रेड झोन’मध्ये पोचलेले आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण कुठलीही परवानगी न काढता दररोज आडमार्गाने जातात व येतातसुद्धा.. हीच फारमोठी धोक्याची घंटा बुलढाणा जिल्ह्यासाठी सध्यातरी दिसत आहे..