महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या ३६ तासात सर्वाधिक दोनशे कोरोना ग्रस्त रुग्णांची वाढ झाल्यामुळे पुणे शहरातील चिंता वाढली आहे. काल रात्री नऊपासून आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ३५ नवीन रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या ३१६९ झाली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत १६८ बळी गेले आहेत.
पुण्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली असून आज (दि. १३) सकाळपर्यंत तेराशे ५८ रुग्णांना घरी परत पाठविण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये १६०८ एवढे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यापैकी ११६ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने आज सकाळी दिली.