भीमा कोरेगावच्या लढाईत गुलामी संपली : प्रकाश आंबेडकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ जानेवारी २०२३ । भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शौर्यदिनाचे यंदाचे २०५ वे वर्ष असून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगावमध्ये येथे दाखल झाले आहेत. त्याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभास अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की,आपल्या देशात हजारो वर्ष राजकीय गुलामी होती. पण भीमा कोरेगावच्या लढाईत गुलामी संपली. भारताच्या स्वातंत्र्याच सामाजिक आणि राजकीय इतिहासाला येथून सुरुवात झाली. त्यामुळे आजच्या दिवशी हजारो लाखो नागरिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मी आजचा दिवस आनंदाचा मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, कोणी काय विधान करावं. ते विचारपूर्वक करावं नाही.तर ते त्यांच्याच आंगलट येतं.अशी परिस्थीतीती आहे. पण करणी सेनेच्या मागे कोणीच नाही. हे यातून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यास अद्याप पर्यंत कोणताही नेता आला नाही. त्यावर ते म्हणाले की, कोणी अभिवादन करायला यायच न यायच हा त्यांचा प्रश्न असल्याच त्यांनी यावर भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *