महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ जानेवारी । राजस्थानच्या पाली येथे मुंबई-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून १० प्रवाशी जखमी झाले आहेत. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी मध्यरात्री मुंबई-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेस मारवाड येथून निघताच अचानक रुळावरून घरसली. या अपघातात रेल्वेचे आठ डबे रुळांवरून घसरले असून ११ डब्यांचे नुकसान झाले आहे. तसेच या अपघाताची माहिती मिळतात अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबरोबरच प्रवाशांच्या मदतीसाठी ०२९१- २६५४९७९(१०७२), ०२९१- २६५४९९३(१०७२), ०२९१- २६२४१२५, ०२९१- २४३१६४६ हे हेल्पलाईन क्रमांकही रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
Pali, Rajasthan | 8 coaches of Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express train derailed between Rajkiawas-Bomadra section of Jodhpur division at 3.27am today. No casualty reported. An accident relief train has been dispatched from Jodhpur by Railways:CPRO, North Western Railway
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) January 1, 2023
दरम्यान, “गाडी मारवाड जंक्शन येथून निघताच अचानक व्हायब्रेशन सुरू झाले आणि काही मिनिटाच गाडी थांबली. आम्ही खाली उतरू बघताच गाडीचे काही डब्बे रुळावरून घसरले होते”, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.