Maharashtra Politics: “छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक?”; अमोल कोल्हे यांनी सांगितले …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ जानेवारी । राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गट यावरून आक्रमक झाला आहे. अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणी भाष्य केले आहे.

अजितदादांनी अधिवेशन काळात वक्तव्य केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. स्वराज्यरक्षक मालिका करत असताना जे जाणवले ते मांडत आहे. इतिहासाचा तर्कशुद्धीने विचार करायला हवा. छत्रपती शंभुराजे यांनीच लिहिलेला ग्रंथ पाहिला तर त्यात त्यांनी धर्माची उत्तम चिकित्सा केली आहे. त्यांनी त्यावर श्लोक रचला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले. धर्मासाठी बलिदान दिले, याचा अभ्यास केला तर याचे काही पुरावे आहे. त्यामध्ये काही इतिहासकारांनी जे काही लिहून ठेवले आहे, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक?

अमोल कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, जबरदस्तीने ज्यांचे धर्मांतरण झाले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुन्हा एकदा हिंदू धर्मात शुद्धिकरण करुन हिंदू धर्मात स्वागत केले होते. संभाजी महाराजांनी नेहमी हा कित्ता गिरवला. जबरदस्तीने आणलेल्या धर्मांतरावर त्यांनी बंदी आणली होती, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले. औरंगजेब बादशाहने शंभुराजेंनी बंदी केल्यानंतर २ प्रश्न विचारले होते. स्वराज्याच्या खजिना कुठे आहे आणि औरंगजेबाची कोणती लोक शंभुराजांना शामिल आहेत. असे चारही इतिहासकार नमूद करतात. धर्मांतर करायला त्यांनी नकार दिला याचा कुठेही आधार नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *