महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – स्वातंत्र्यापूर्वी काळात ब्रिटीश कंपन्यांनी देशातील उद्योगांवर नियंत्रण ठेवले होते. कच्च्या मालाची निर्मिती भारतात केली जात होती आणि या कच्च्या मालाच्या जोरावर ब्रिटिश ब्रिटिशा त मोठ मोठे उद्योगात उत्पादित वस्तूंची निर्मिती करायचे आणी त्याच वस्तू भारतात वापरायला भाग पाडायचे. ब्रिटनच्या औद्योगिक क्रांतीत भारतातील कामगार आणि संसाधने यांचे मोठे योगदान आहे.
या देशातील कोट्यवधी रुपये पूर्णपणे चोरून ब्रिटनला पाठविण्यात येत होते. गांधीजींनी देशाला त्या विरोधात “स्वावलंबी” (आत्मनिर्भर ) बनवण्यासाठी “स्वदेशी” माल अवलंबण्याचा आग्रह धरला होता. भारताबाहेर जाणारे कोट्यवधी रुपये वाचवावे आणि देशाच्या विकासात वापरावेत, अशी त्यांची इच्छा होती. हाच दृष्टिकोन समोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल नको लोकल बना. असा संदेश देत आत्म स्वावलंबी ( आत्मनिर्भर) व्हा असे भारतवासीयांना सूचित केले.
स्वदेशी म्हणजे देशातील कंपन्या व कारखाने मजबूत करणे. स्वदेशी उद्योगांना चालना दिली पाहिजे. देशाला “स्वावलंबन” बनवण्याअंतर्गत महात्मा गांधीं नी परदेशी वस्तूंची होळी पेटवली…….. आपण होळी ऐवजी चिनी वस्तू चीनला भारतात पाठवता (निर्यात ) येणार नाहीत इतके आयात शुल्क सरकारने लावावे. कारण जेव्हा आपल्या स्वदेशी वस्तू चीनच्या चिनी वस्तूंपेक्षा स्वस्त होतील, तेव्हाच आपल्यासाठी “स्वयंपूर्ण” ( आत्मनिर्भर) होणे सोपे होईल.