साडे तीनशे वर्षे उलटूनही अद्याप अनेकांना छत्रपती संभाजी महाराज उमगले नाहीत ; मदन साबळे यांनी व्यक्त केली खंत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – सातारा – विशेष प्रतिनिधी – सुनील आढाव – हिंदुस्तानामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले परंतु, ते महापुरुष कसे झाले. त्यांचे कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांचा त्याग हा खूप मोठा होता. यामुळे ते कायम स्मरणात राहिले आणि जोेपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, तोपर्यंत त्यांच्या विचारांची ही साठवण कायम आठवणीत तेवत राहील. हेच विचार समाजातील प्रत्येक घटकाला चांगल्या मार्गाकडे नेत असतात. मात्र साडे तीनशे वर्षे उलटूनही अद्याप कित्येकांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उमगले नाहीत. त्यांचे आचार, विचार समजलेले नाहीत. ही खरी तर आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल , अशी खंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा नमो नमो मोर्चा (भारत )चे सातारा जिल्हा अध्यक्ष मदन भिमाजी साबळे यांनी व्यक्त केली.

आजच्या युगात वावरत असताना आपण जर शंभूविचारांचे पाईक बनलो तरच खऱ्या अर्थाने आपण संभाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. असे मानने उचित ठरेल. कारण संभाजीराजे हे रणधुरंधर योध्ये होते. 32 वर्षांच्या आयुष्यात एकही युद्ध ते पराजित झाले न्हवते. एवढेच काय तर युद्धतंत्रातील नवनवीन प्रयोग ते करत असत. युद्धनीतीत निपुण असलेले छत्रपती संभाजी राजे यांनी म्हैसूरचा राजा चिकदेवराय याच्याशी युद्धात जगातील पाहिले बुलेटप्रूफ जॅकेट बनवले होते व मोठा विजय प्राप्त केला होता.

छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षण करताना यवनांकडून कधीच महिला मुलांच्यांवर अत्याचार होऊ दिले नाहीत. अखंड हिंदुस्थानावर मुघल सल्तनतला आपला परछम कधीही फडकवू दिला नाही. हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास दबाव आणला जायचा. मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी यवनांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ दिला नाही.

म्हणूनच अभिमानाने म्हणावे वाटते, महाराज नसते तर आपला म्हादूचा महंमद, सीताबाईची सकीरा झाली असती. गणपतचा गणी खान झाला असता. छत्रपतींनी कधीच भगवा झेंडा खाली पडू दिला नाही. कुठल्या रंगाचा, कुठल्या धर्माचा वेगळा अर्थ काढू नये. सर्वधर्म एक सारखेच आहेत. सर्व धर्मांनी एकच शिकवले, माणूस आणि माणुसकी. चांगली हे सर्व जण सांगतात. त्यामुळे कुठलाही धर्म वेगळा नाही. किंवा उच्च नाही ना नीच नाही सर्व धर्म सारखेच. माणुसकीची शिकवण देतात. हे शंभूविचार जरी आचरणात आणले तरी आपण खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली असे आपण अभिमानाने म्हणू.! अशी भावना साबळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *