CNG-PNG Price hike : नव्या वर्षात सर्वसामान्यांना पहिला मोठा दणका : CNG-PNG च्या दरात मोठी वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ जानेवारी । नव्या वर्षात कारच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे नवीन कार घेणाऱ्यांना हा झटका आहे. सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. एवढच नाही तर आता CNG आणि PNG चे दरही वाढले आहेत. त्यामुळे CNG साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. महागाई वाढतच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका याचा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बसला आहे.

गुजरात गॅसने सीएनजी-पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सीएनबीसी आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,गुजरात गॅसनेसीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे.

किंमती 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात गॅसने औद्योगिक गॅसची किंमत ‘७/एससीएम’ने कमी केली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *