निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी सदिच्छा भेटीदरम्यान केली मागणी
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ जानेवारी । पिंपरी-चिंचवड । दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर दानवे तळेगाव येथील माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना निगडी येथील उड्डाणपुलावर दानवे यांचा ताफा अचानक थांबला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोन क्षेत्र कायमस्वरुपी रद्द करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी संरक्षण मंत्रालयाची आपण स्वतः बोलून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दानवे यांनी काळभोर यांना दिले.
तळेगाव येथील दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे ह्यांच्या निवासस्थानी तळेगाव दाभाडे ह्या ठिकाणी जाताना निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर याना भेटण्यासाठी रावसाहेब दानवे पाटील निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी रस्त्यावर गाड्यांचा ताफा थांबवून सचिन काळभोर यांची धावती भेट घेतली .मुळात या ठिकाणी थांबण्याचा प्रोटोकॉल नसतानाही केंद्रीय मंत्री दानवे यांनी काळभोर यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आपला वाहनांचा ताफा थांबविला. व सामाजि कार्यकर्ते सचिन काळभोर यांची धावती भेट घेतली. या भेटीदरम्यान, विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे काळभोर यांनी सांगितले. विविध समस्यांचेदेखील निवारण करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू, असे आश्वासनदेखील रावसाहेब दानवे यांनी काळभोर यांना दिल्याचे समजते.
दरम्यान, यावेळी रेड झोन क्षेत्र कमी करण्याची आग्रही मागणी सचिन काळभोर यांनी प्रामुख्याने केली. त्यासंदर्भात संरक्षण मंत्री यांच्या बरोबर बोलणं करून त्या संदर्भात बैठक घेण्याची ग्वाही खुद्द रावसाहेब दानवे पाटील यांनी सचिन काळभोर यांना दिली..
पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन क्षेत्र कमी झाले तर बांधकाम परवाना मिळेल तसेच बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई थंड होईल, अशी अपेक्षा सचिन काळभोर यांनी व्यक्त केली. रेडझोन क्षेत्र २००० यार्ड वरुन ५०० मीटर करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. रावेत, किवळे, चिखली, मोशी, तळवडे, निगडी, बोपखेल, दिघी या गावांना रेड झोन क्षेत्र कमी झाल्याने दिलासा मिळेल.
पुणे जिल्हाधिकार्यांच्या नावाने रेड झोन क्षेत्र नकाशा जाहीर केला असून त्याचा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. जाचक अटी शर्ती नियमानुसार धोरण राबवून नव्याने नकाशा जाहीर करण्यात आला आहे.