दुकानांबाहेरील लांबच लांब रांगा आता टळणार ? घरपोच मद्यविक्री आजपासून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी -लक्ष्मण रोकडे – राज्य उत्पादन शुल्क विभागाची घरपोच मद्य योजना शुक्रवारी १५ मेपासून सुरू होत असून, यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानांबाहेरील लांबच लांब रांगा आता टळणार आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून ,
त्यानुसार आज शुक्रवारपासून सकाळी दहा वाजल्यापासून घरपोच मद्य पोहचविण्याची योजना सुरू होईल. ग्राहकांना आता मद्यविक्री दुकानात फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवरून मद्याची मागणी नोंदवता येईल. घरपोच मद्य पुरविण्यासाठी दुकानदारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. असे करणाऱ्यांवर विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल. मद्याच्या बाटलीवर नमूद केलेल्या एमआरपीप्रमाणेच मद्य विकावे लागेल. मद्याची किंमत रोख स्वरूपात अथवा क्रेडिट, डेबिट कार्ड स्वाइप करून स्वीकारता येईल, असे आदेशात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *