मेस्सीने केला स्वप्नभंग ; आता निवृत्त, दर आठवड्याला 1 कोटी रुपये पगार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ जानेवारी । फ्रान्सचा विश्वविजेता कर्णधार ह्युगो लॉरिसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. ह्युगो लोरिसच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. ह्युगो लोरिसच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने यंदाही अंतिम फेरी गाठली होती, मात्र यावेळी संघ चॅम्पियन होऊ शकला नाही. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने अप्रतिम खेळ दाखवत आपल्या संघाला विश्वविजेते बनवले.

36 वर्षीय फ्रेंच गोलकीपरने सांगितले की तो आता फक्त क्लब फुटबॉलवर लक्ष केंद्रित करेल. ह्युगो लॉरिस इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅमकडून खेळतो. ह्युगो लॉरिसला दर आठवड्याला एक कोटी रुपये पगार मिळतो. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅमकडून खेळण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे 36 वर्षीय गोलरक्षकाने ‘एल’इक्विप’ वृत्तपत्राला सांगितले.

ह्यूगो लॉरिस म्हणाला, मला सतत चांगले खेळायचे आहे. या निर्णयामुळे मी क्लबसाठी अधिक चांगले खेळू शकेन. मला पुढील 4-5 महिने टॉटनहॅमसोबत चांगले खेळून प्रीमियर लीगच्या टॉप 5 मध्ये यायचे आहे. एफए कप आणि चॅम्पियन्स लीगमध्येही या कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छितो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *