Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करायचाय तर गडकरींना जाऊन भेटा; अजितदादांचा तटकरेंना सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ जानेवारी । मुंबई गोवा महामार्ग हा गेले कित्येक वर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. महामार्गावरती होत असलेल्या अपघातामुळे दुर्दैवाने अनेकांसाठी हा मृत्यूचा मार्ग ठरला. आता यास मुंबई गोवा महामार्गावरून रखडलेल्या कामामुळे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली नाराजी थेट व्यक्त केली आहे. कोकणातील मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले दहा वर्षापेक्षा अधिक काळ रखडले आहे. या मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी अक्षरशः त्रासून गेले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घ्या, जे काही करायला लागेल ते करा, अशी सूचना त्यांनी खासदार सुनील तटकरे यांना केली आहे. कोकण गोवा महामार्गावर स्पष्ट शब्दात विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अजित पवार बोलत होते.

कोकण रेल्वे सुरू करण्याचे स्वप्न त्याचं श्रेय हे उभे महाराष्ट्र मधु दंडवते यांना देतो. अर्थात यासाठी शरद पवार साहेबांचाही सपोर्ट होता, हेही असाही उल्लेख अजित पवार यांनी व्यक्त केला. पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या दशकापासून रखडलेल आहे. हे रखडलेलं काम लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडून मार्गी लागावे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.त्यांचे योगदान कोकणच्या विकासात असावे. कोकणामुळे महाराष्ट्राला विकासाची चालना मिळावी अशी, अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. कोकणात जाणारे लोक रस्त्याच्या अवस्थेमुळे अक्षरशः वैतागून गेले आहेत. कितीतरी टर्म झाल्या पण तो रस्ता काही होत नाही, अशा शब्दांत अजित पवार स्पष्ट नाराजी व्यक्त केली. रखडलेल्या कोकण कोकणातील मुंबई गोवा महामार्गाच्या वेदना त्या रस्त्याने जाणाऱ्यांना कळतात, हेही आपण सर्वांनी लक्षात घेयला हवे असेही स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *