![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ जानेवारी । आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान (Temperature) 10 ते 15 अंशाच्या असापास आहे. तर काही ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली देखील आहे. विशेषत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळं राज्यात गारठा वाढला असून, थंडीची लाट कायम आहे. थंडीपासून बचावर करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. पाहुयात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान…..
पाहा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
सोलापूर – 14 अंश सेल्सिअस
सातारा – 10.8
नाशिक – 9.2
नांदेड – 12.4
कोल्हापूर – 14.9
जळगाव – 7
औरंगाबाद – 9.4
रत्नागिरी – 15.5
मुंबई (कुलाबा) 19.4
पुणे- 8.3
उस्मानाबाद – 10.4
परभणी – 12.5
नंदूरबार – 11.1
अहमदनगर – 10.5
अमरावती 10
अकोला 12
बुलढाणा 14
चंद्रपूर 13
गडचिरोली 11
नागपूर 11
यवतमाळ 11
वर्धा 11