जगातील सगळ्यात दुर्मिळ रक्त गट ? प्रत्येक थेंब सोन्यापेक्षा महाग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ जानेवारी । रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अनेक लोक रक्तदान करतात. तुमच्या एका रक्ताच्या थेंबामुळे कोणाचं आयुष्य वाचू शकतं त्यामुळे रक्तदान केव्हाही चांगलंच. एखाद्या व्यक्तीला तात्काळ रक्ताची गरज असल्यास पहिल्यांदा रक्तगट पाहिला जातो. रक्तगट मॅच झाला तर आपण गरजू व्यक्तीची लगेच मदत करु शकतो. प्रत्येक व्यक्तीचा भिन्न रक्तगट असल्यामुळे प्रत्येक रक्तगटाचं वेगळं असं विशेष महत्त्व आहे. एका दुर्मिळ रक्तगटाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जो रक्तगट ठराविक लोकांमध्येच आढळतो.

जगात साधारणपणे 8 प्रकारचे रक्तगट आढळतात. ज्यात A, B, AB आणि O यांचा समावेश असतो. या आठ रक्तगटांच्या व्यतिरिक्त, एक रक्तगट आहे जो जगातील काही लोकांमध्ये आढळतो, जो अत्यंत दुर्मिळ असतो. हा रक्तगट फक्त अशा लोकांमध्ये आढळतो ज्यांचे आरएच फॅक्टर शून्य आहे. तुम्हाला याविषयी माहिती आहे का? हे रक्त जगात फक्त 45 लोकांच्या शरीरात वाहते. या रक्तालाल ‘गोल्ड ब्लड’ म्हणतात.

या दुर्मिळ रक्ताचं वैशिष्य्य नक्की काय आहे? ग्रीसमध्ये असे मानले जाते की देवतांच्या शरीरात सोनेरी रक्त वाहते. हे सोनेरी रक्त देवांना अमर बनवते, पण आता जेव्हा मानवाचा प्रश्न येतो तेव्हा हे सोनेरी रक्त त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. हे पहिल्यांदा 1961 मध्ये आढळून आले. हे रक्त इतर सामान्य रक्तगटांपेक्षा खूप वेगळे आहे, त्यामुळे त्याला ‘गोल्डन ब्लड’ म्हणतात. जेव्हा आपल्याला एखाद्या आजारी व्यक्तीसाठी रक्ताची गरज भासते तेव्हा रक्तपेढीमध्ये सामान्य रक्त देऊन आपण आपल्या गरजेनुसार रक्त मिळवू शकतो, परंतु जेव्हा सोनेरी रक्त येते तेव्हा ते इतके दुर्मिळ असते की त्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त असते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोनेरी रक्ताचे कारण अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे होते आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, याचे दुसरे कारण म्हणजे जवळच्या नात्यातील लग्न, ज्यामुळे सोनेरी रक्त येण्याची शक्यता वाढते. याबाबत ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये अहवालही प्रसिद्ध झाला होता. या रक्तगटाच्या लोकांना अॅनिमियाचा धोका जास्त असतो. काही वेळा सुरक्षेमुळे अशा लोकांची ओळख पटली तरी ते उघड होत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *