महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ जानेवारी । पिंपरी-चिंचवड । दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनी पुणे चिखली घरकुल येथे मधु ताराची सहयोगी संस्था श्री राजू हिरवे साहेब यांची झुंज दिव्यांग संस्था यांच्या माध्यमातून आयोजित आंतरजातीय दिव्यांग विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.आज या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून राजू हिरवे आणि त्यांच्या सहयोगी यांचे महान कार्य साक्षात अनुभवण्याच भाग्य मिळाल्याच नितीन शिंदे यांनी म्हटले.या वेळी वांगणी मुंबई येथील (अंध) दिव्यांग संस्था स्वामी ज्ञान ब्लाइंड विद्यापीठ या संस्थेला ११ डिसेंबर २०२२ रोजी मुंबईच्या मधु तारा टीम सोबत भेट दिली होती. त्या वेळी संस्थेचे प्रमुख श्री शिनगारे आणि वीठल काका यांनी आमच्या संस्थेचे दोघे धीरज आणि अश्विनी यांचे लग्न करायचे आहे त्या वेळी त्यांना मधु तारा ने शब्द दिला होता तो शब्द आज राजू हिरवे साहेब यांच्या संस्थेने लग्न सोहळा आयोजित केला असता अश्विनी आणि धीरज यांचे ही सहा जोड्या सोबत लग्न लावून दिले व संसारपयोगी सर्व भेट वस्तूही दिल्या.या लग्न सोहळ्याला प्रशासन अधिकारी यांच्या सोबत समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सहयोग तसेच भरभरून नव दांपत्यास आशीर्वाद दिले व राजू दादा यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचा शब्दरुपी गौरव सन्मानही केला.या वेळी श्री नितीन शिंदे यांनी सीमा पेटकर यांच्या किडनी ट्रान्स्फर ऑपरेशन ही करून देण्याचे भाषणात सांगितले या वेळी भू माता ब्रिगेड प्रमुख बिग बॉस फेम तृप्ती देसाई यांनीही मधु ताराच्या कार्याची प्रशंसा करत सोबत राहून समाजासाठी कार्य करू असे सांगितले.