Maharashtra Winter News : रेकॉर्ड ब्रेक करणार ; उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ जानेवारी । जानेवारीच्या सुरूवातीपासून थंडीची लाट उत्तर भारतासह महराष्ट्रातील विदर्भात आली. यानतंर राज्यातील अने जिल्ह्यात थंडीची लाट आल्याने तापमानात कमालीची घट झाली. दरम्यान पुढच्या काही दिवसांत हाडे गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव उत्तर भारताला येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता असून, या शतकात प्रथमच तापमान उणे 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

मागील पंधरवड्यापासून संपूर्ण उत्तर भारत हाडे गोठवणाऱ्या थंडीच्या लाटेचा अनुभव घेत आहे. राजधानी दिल्ली तर दीड अंश तापमानापर्यंत खाली आहे. काश्मीर व हिमाचलात तापमान उणे 2 ते 4 अंशांपर्यंत पोहोचले आहे; पण उत्तर भारतातील पठारी अद्याप तापमान 5 अंशाच्या खाली न आल्याने थंडीची लाट सोम्य आहे. परंतु पुढच्या काही दिवसांत उत्तर भारताच्या पठारी भागांत तापमान उणे 4 अंश इतके खाली जाण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ते 19 जानेवारी हे दिवस उत्तर भारतासाठी सर्वाधिक थंडीचे असणार आहेत. त्यातही 16 ते 18 जानेवारी या कालावधीत थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात सलग 11 दिवस कडाक्याच्या थंडीचे राहण्याचा प्रकार गेल्या काही दशकांत प्रथमच घडला आहे; पण जर आगामी काळात पारा उणे 4 च्या आसपास गेला, तर ते या शतकातील पठारी भागाचे नीचांकी तापमान ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब

हिवाळा सुरू झाला की दिल्ली आणि परिसरात हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरूवात होते. दरम्यान याबाबत आपण दिल्लीपाठोपाठ मुंबईची हवा खराब झाल्याची माहिती ऐकली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून मुंबईचीही हवा खराब झाल्याची माहिती आपण वाचत आलो आहोत परंतु आता महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्याचेही हवामान खराब होत चालले आहे.

मागच्या दोन महिन्यातील सर्वाधिक हवामान खराब असल्याची माहिती देण्यात आली आहे.मागच्या दोन महिन्यांपासून पुणेशहराच्या हवेची गुणवत्ता खराब (पूअर) होत गेली आहे. पुणे शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *