महाराष्ट्र २४- ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी -बुलढाणा – गणेश भड – बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे कांदा उत्पादक आहेत.लॉकडाऊन व संचारबंदी असल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे घसरल्याने कांदा उत्पादक करणारा शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे काय करावे हेच शेतकऱ्याला सुचेना.मार्च महिन्यापासून राज्यात लाखो टन कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे काही शेतकऱ्यांकडे कांदा चाळ उपलब्ध नसल्याने व बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने कांदा शेतातच सडत आहे,
करोना महामारीमुळे राज्यातील बाजार समित्या बहुतांशी बंदच आहे,लॉकडाऊन व संचारबंदीमुळे राज्यातील लासलगाव, अहमदनगर, सोलापूर, पुणे या प्रमुख बाजार समित्या बंद आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कांदा विक्री कशी व कुठे करायची ही समस्या निर्माण झाली आहे. काही मोजके बाजार समितीत कांदा लिलाव होत आहे. तेथे कांद्याला दोन रुपयापासून आठ रुपयेपर्यंत सरासरी पाच रुपये इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हताश झाला आहे,तरी शासनाने शासकिय खरेदी चालू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.