महाराष्ट्र २४- ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी – पणजी – ओमप्रकाश भांगे – गोव्यामध्ये शून्यावर आलेला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढायला लागला आहे. त्यामुळे जरी रेल्वेने नवी दिल्ली ते तिरुअनंतपुरम अशी विषयी गाडी सोडली असली तरी ती मडगाव स्थानकावर थांबणार नाही. गोव्यात पर्यटक आले तरी त्यांना 14 दिवस हॉटेलच्या रूमवरच क्वारंटाईन व्हावे लागेल. सर्व समुद्रकिनारे प्रवेशासाठी बंद आहे. त्यामुळे गोव्यात मजा मारण्यासाठी येऊ नका असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.
दिल्ली ते तिरुअनंतपुरम ही विशेष गाडी रेल्वेने सोडली आहे. या गाडीतून मडगावला उतरण्यासाठी 720 लोकांनी बुकिंग केले आहे. यामध्ये फारच कमी गोव्याचे आहेत. 15 मेला जाहीर करण्यात आलेली तिरुअनंतपुरम ही विशेष गाडी 16 मेला गोव्यात पोहोचणार असली, तरी ती मडगावला थांबणार नाही. त्याचप्रमाणे गोव्याचे लोक जरी विशेष विमान किंवा रेल्वेने दाखल झाले तरी त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी विशेष गाडी मडगावला थांबणार नाही असे सांगितले असले तरी कोकण रेल्वेने मात्र या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे जरी पर्यटक मडगावला उतरले तरी त्यांची चाचणी करून त्यांना त्यांच्या हॉटेलवर 14 दिवस राहावे लागणार आहे.