महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ जानेवारी । राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक राजकीय पक्ष त्यांचा उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसताना दिसत आहे.
या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाने सत्यजीत तांबे यांच्या राजकीय भूमिकेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या राजकीय घडामोडीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मी बोलतोय ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवडणार नाही. पण भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा चेहरा राधाकृष्ण विखे पाटील हे होऊ शकतात. त्यामुळे ही खेळी आहे. नगरमध्ये बाळासाहेब थोरतांना आपणही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘काँग्रेसवर भरोसा ठेवू नका, असे मी शिवसेना ठाकरे गटाला सांगितले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खोटारडे व्यक्ती आहेत. त्यांची सत्ता असताना मला मंत्री करतो म्हणाले होते, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ‘मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार आहे. कारण त्यांनी कोणी पैसे गोळा केले, हे अप्रत्यक्षरित्या सांगितले, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.