कोपरगावात तीन दिवस चाललेल्या मकर संक्रांतीच्या सणाच्या शेवटच्या दिवशी पतंग ढोल ताशांच्या आतिष बाजीत केली सांगता…

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : दि,16 जानेवारी :

प्रतिनिधी अजय विघे

कोपरगाव शहरात अनेक वर्षांपासून पतंग उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो. लहानापासून तर मोठ्या माणसा पर्यंत पंतग उडविण्याचा आनंद कोपरगावकर घेत असतात. शहरात हा उत्सव पाच ते सहा दिवस चालतो, घरावर गाण्याचा तालावर तरुण जल्लोष करून पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. पतंग उत्सव म्हटले की, सर्वांत प्रथम गुजराथ राजस्थान डोळ्यासमोर येते. गुजरात राजस्थान मध्ये पंतग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या राज्यात विदेशातील नागरिक पतंग उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रातही हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात येवला यानंतर कोपरगावचा नंबर लागतो असे म्हणण्यास हरकत नाही. शहरात प्रत्येक घरावर मुले, तरुण नागरिक पतंग उडवीत असतो. शहरातील छतावर टेरेसवर मोकळ्या मैदानात मोठ्या संख्येने पंतग उडवितात. पतंग कापण्यासाठी अनेकांची रेस लागते. पतंग कटला की, वकाडे, कटारे बो, अशा आरोळ्या तरुण लहान मुले देत असतात. पतंग कापण्याच्या नादात अनेक तरुणांचे भांडणे देखील होतात. शहारात रंग बेरंगी पतंगाने आकाश रंगीत झाले होते. डी. जे तालावर तरुण नाच गाणा करत आनंद व्यक्त करत होते. शहरात मकर संक्रात निमित्ताने पतंग उत्सव होत असतो. मकर संक्रातीच्या संध्याकाळी नविन वस्त्र परिधान करून एकमेकांना तिळ गुळ देवुन आनंद साजरा करतात. एकमेकांच्या घरी जावून थोर मोठ्यांचा आर्शिवाद घेतला जातो. अनेक वर्षांपासून हा उत्सव पारंपारिक होत चालला आहे. पंतगासाठी आदल्या दिवशी मांजा करण्यासाठी रात्री तरुण जागरण करुन मांजा करतात. गल्ली गल्ली हा प्रकार चालु असतो. नंतर मकर सक्रांतीच्या दिवशी या मांज्याच्या सहाय्याने पतंग उडविले जाते. त्यात चायना मांजा या पारंपारिक सणामध्ये अडखळा घालत असून या चापना मांज्या मुळे अनेकांचे प्राण गेले. या माज्यावर बंदी आहे. परंतु छुप्या पद्धतीने या माज्यांची विक्री झालीच प्रशासनाने देखील यावर कडक कारवाई केली. संक्रातीच्या दुसर्या दिवशी अनेक पतंग गोदावरी नदीत पडलेले असतात. तरुण मुले आपल्या छतावर डी.जे. लाउडस्पीकर, ढोल ताशा लावून पतंग उडवितात. दुसयाँचा पतंग कापल्यावर वक्काडे, कटलारे आरडाओरडा केला भो अशा घोषणा देवून जातो. पतंगाचेही प्रकार आहे. गोडन, फाफडा, ढोल असे कागदी प्लास्टिक चे पतंगाचे प्रकार आहे. असा विशेष पतंग महोत्सव कोपरगावात दरवर्षी होत असतो. काही ठिकाणी लाउडस्पीकरच्या सहाय्याने क्रिकेटच्या खेळाप्रमाणे कॉमेट्री देखील केली जाते. कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे मकर संक्रात निमित्ताने याही वर्षी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला आजच्या मोबाईलच्या इंटरनेटच्या जमान्यात अनेक उत्सव सणावर परिणाम झाला. परंतु कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाण पंतग उडविण्याचा आनंद गेल्या दोन चार दिवसापासून जोरदार सुरु आहे. मोबाईल, इंटरनेटच्या दुनियात पंतग उत्सवावर यांचा काहीच परिणाम झाला नाही. मकर संक्रांतीनंतर दोन तिन दिवस हा उत्सव सुरूच राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *