महाराष्ट्रातील सर्व घरगुती व औद्योगिक संस्थांचे (लघु उद्योजक) तीन महिन्यांचे वीजबिल माफीसाठी केंद्रसरकार कडून मदत मिळावी. ; प्रदीप गायकवाड.

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- ऑनलाईन- पिंपरी चिंचवड- सध्या कोरोना सारख्या महामारी मुळे संपूर्ण देशात लाँकडाऊनची स्थिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर रेडझोन मध्ये असल्याने याठिकाणी सर्व एमआयडीसी, उद्योग ,व्यापार, गेली दोन महिने पुर्णपणे बंद आहेत. यामुळे उद्योजकासह कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी किती अवधी लागेल हे सांगता येत नाही. उद्योजक ,व्यापारी , कामगार आर्थिक संकटातून जात असताना आपण या लाँकडाऊनच्या काळातील म्हणजे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्या वीजबिल सरसकट माफ करावे.

त्यात घरगुती, व्यवसायिक स्वरूपात असलेल्या वीजबिलाचा समावेश करण्यात यावा. जुन महिन्यापासून चे लाईटमिटर रिडींग घेवून विजबिल आकारणी करण्यात यावी.यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदिप गायकवाड यांजकडून दि. १३/०५/२०२० रोजी ऊर्जा मंत्री (श्री.डॉ नितीन राऊत ) तसेच उद्योग मंत्री (श्री. सुभाष देसाई) यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.ह्या विषयाला अनुसरून पत्रकार परिषदेत डॉ नितीन राऊत (ऊर्जा मंत्री ) यांच्याकडून सांगण्यात आले कि केंद्राकडून मदत मिळाली तर ह्या बाबतीत विचार केला जाईल. वरील बाबींचा विचार करून आपण केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य प्राप्त करावे. जेणे करून सर्वसामान्य तसेच औदयोगिक संस्थांना ह्या बिकट परिस्थितीत दिलासा मिळेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *