महाराष्ट्र २४- ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी – लंडन : कोरोनावर मात करणाऱ्या लसीवर संशोधन सुरु असून हे यशस्वी झाल्याल ही लस सर्वांना उपलब्ध आणि परवडणारी असेल असे मत ऑक्सवर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक आणि संशोधकांनी व्यक्त केले आहे. ऑक्सवर्ड जेनर संस्थेचे संचालक अड्रायन हिल यांच्या ड्रगमेकर एस्ट्राझेनेका AstraZeneca (AZN.L)टीममार्फेत कोरोनावर मात करण्यासाठी लसीवर संशोधन सुरु आहे. ही लस सर्व कमी किंमतीत आणि सर्वत्र उपलब्ध असेल असे मत अड्रायन हिल यांनी व्यक्त केले आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
ही एक सिंगल डोस लस असून याचा जागतिक स्तरावर पुरवठा होणार आहे. ही लस सर्व ठिकाणांवर अगदी शेवटच्या रुग्णापर्यंत पोहोचावी अशी इच्छ हिल यांनी व्यक्त केली.
संशोधन सुरु असलेली लस ‘ChAdOx1 nCoV-19’ या नावाने ओळखली जाते. कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी ही लस समोरुन लढा देतेय. सहा माकडांवर या लसीचे परीक्षण करण्यात आले. काही माकडांमध्ये एका डोसमध्येच वायरस विरुद्धची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुरुवात झाल्याचे १४ दिवसात दिसून आले तर इतरांना सर्वसाधारण २८ दिवसांचा कालावधी लागला.
प्राण्यांवरील यशस्वी संशोधनानंतर मानवावरील या लसीचा प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास हिल यांनी व्यक्त केला. जुलै किंवा ऑगस्टपर्यंत ही लस सज्ज असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.