पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट ; राजकीय चर्चेला उधाण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ जानेवारी । राजकीय वर्तृळातून मोठी बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शंभूराज देसाई यांच्या शासकीय बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीदरम्यान शंभूराज देसाई आणि पार्थ पवार यांच्यामध्ये सुमारे पंधारे ते वीस मिनटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. काही खासगी कामासाठी शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.

पंधरा ते वीस मिनीट चर्चा

आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घतेली आहे. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर जाऊन देसाई यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली? तसेच या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

पार्थ पवार यांनी आज अचानक मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र काही खासगी कामासाठी शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचा खुलासा पार्थ पवार यांनी केला आहे.

‘पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ’
दरम्यान दुसरीकडे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या भेटीबाबत मोठा दावा केला आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ते राजकीय स्थिरतेच्या शोधात आहेत, त्यामुळे त्यांनी देसाई यांची भेट घेतल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *