चिंचवड विधानसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील घोषित करण्यात यावा – सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – कै लक्ष्मण जगताप ह्यांचे निधन झाल्यानंतर चिंचवड विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा निवडणूक होणार असून मतमोजणी २ मार्च रोजी होणार असून चिंचवड विधानसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील घोषित करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळ भोर यांनी मुख्य निवडणुक आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटल आहे की, चिंचवड विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून घातपात होण्याची दाट शक्यता आहे गेल्या वर्षी कै लक्ष्मण जगताप ह्यांचे बंधू शंकर जगताप ह्यांच्या कार्यालय ह्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला होता तसेच पोटनिवडणुकीत नवीन उमेदवार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून साम दाम दंड भेद निती वापर करून निवडणूक तयारी करत आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघ काळेवाडी रहाटणी वाकडं डांगे चौक चिंचवड गाव वाल्हेकर वाडी रावेत पुनावळे ताथवडे पिपळे सौदागर पिपळे निलख दापोडी फुगेवाडी ह्या ठिकाणी गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असून पोटनिवडणुकीत मतदार ह्यांना धमकी देऊन मतदार ह्यांच्या वरती दबावतंत्र वापर होवू शकतो. मतदार ह्यांना पैशाच आमिष दाखवून मतदान केले जावू शकते झोपडपट्टी भागात मतदार ह्यांना धमकी देऊन मतदान करण्यासाठी दबावतंत्र वापर करण्यात येवू शकतो २०१९ रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी कै लक्ष्मण जगताप ह्यांना १ लाख पन्नास हजार सातशे २३ मतदान नागरिकांनी केले होते तर राहुल कलाटे ह्यांना १ लाख बारा हजार दोनशे पंचवीस मतदान नागरिकांनी केले होते कै लक्ष्मण जगताप ह्यांचे बंधू शंकर जगताप ह्यांच्या कार्यालय पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला होता त्या अनुषंगाने त्यांना निवडणूक कालावधी मध्ये पोलिस संरक्षण देण्यात यावे तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील घोषित करण्यात यावा,असे ही म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *