Cold Wave Maharashtra News : राज्यात थंडीची लाट ओसरणार ; पण हवामान विभागाने दिला हा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० जानेवारी ।  राज्यातया वर्षाच्या सुरूवातीपासून थंडी पडल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोर वाढला होता. दरम्यान पुढच्या पाच दिवसांत हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचे लोट कमी होत असल्याने राज्यातील तापमान 2 ते 3 अंशांनी उतरणार असल्याची माहिती देण्यात आली.

हवामान विभागाकडून यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांत कडाक्याची थंडी पडली होती. दरम्यान ही थंडी कमी होण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

राज्यातील काही भागात दिवसभर 30 अंशांच्या पुढे तापमान असते तर रात्री अचानक थंडी पडते. याचबरोबर पहाटेच्या वेळी धुके आणि थंडी पडत असल्याने लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पुढच्या 5 दिवसांत सरासरी किमान तापमानात सुमारे 2-3 अंशांनी वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्यास सुरुवात होईल.

निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात उन्हाच्या झळा जाणवरणार आहेत.

दरम्यान राज्यात उत्तरेतील थंडीचा परिणाम काही प्रमाणात जाणवला नसला तरी हवेत गारवा वाढला होता. सध्या महाराष्ट्रात जमिनीपासून हवेच्या अधिक उंच उच्च दाबामुळे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहणार्‍या प्रत्यावर्ती चक्रीय वार्‍यामुळे उत्तरेकडून आपल्याकडे झेपावणार्‍या थंडीला तयार होणारा रोध, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी अजूनही जाणवू देत नाही. अर्थात, कडाक्याची आवर्तने यापुढेही येऊ शकतात, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *