महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – लॉकडाऊन ४ संदर्भात आज केंद्रीय गृह विभागाचे निर्देश येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन ४ हा पूर्णपणे नवा असेल असेही ते म्हणाले. यामध्ये अनेक प्रकारचे बदल आणि सवलती दिल्या जातील असेही ते म्हणाले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय. केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.
काय असतील बदल ?
नागरिकांना स्वत:चे आरोग्य आणि सुरक्षेची काळजी स्वत: घ्यावी लागेल.
केंद्राकडून राज्यांना अनेक गोष्टीत निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल.
ग्रीन झोनमध्ये प्रवास आणि उद्योगांसाठी परवानगी मिळू शकते.
ग्रीन झोनमध्ये बस आणि टॅक्सीसाठी परवानगी मिळू शकते.
प्रवासी ट्रेनला सध्या परवानगी नाही.
स्पेशल ट्रेन आणि श्रमिक ट्रेन पहिल्याप्रमाणे सुरु राहील
१८ मेपासून ठराविक ठिकाणी विमान सेवा सुरु होण्यावर विचार केला जाईल.
आरोग्यमंत्र्यांची माहिती
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सर्वांपुढे मांडले. यातच त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याविषयीच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. या टप्प्यात ग्रीन झोन पूर्णपणे सुरु राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ऑरेंज झोनमध्येसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरु केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते असं ते म्हणाले.