चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन इंद्रायणी थडीचे आयोजन ?सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

Spread the love

महाराष्ट्र 24 : विशेष प्रतिनिधी सुनील आढाव : पिंपरीः भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर इंद्रायणी थडी महोत्सव आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केला आला आहे. २५ ते ३० जानेवारी 2023 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. इंद्रायणी थडी कार्यक्रम खाजगी असून त्याचा फायदा चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार घेवू शकतात. परिणामी या महोत्सवावर कारवाई करून हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे.

सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, आपण स्वतः दखल घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा. ताबडतोब कारवाईचे आदेश देण्यात यावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता नेते मंडळी यांचे फोटो बॅनरवरती लावण्यात आले असून, शहरात सुमारे 200 बॅनर लावण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत आचारसंहितालागू असून शहरात इंद्रायणी थडी भव्य दिव्य कार्यक्रम करोडो रुपये खर्च करून आयोजित करण्यात आला आहे.

‘इंद्रायणी थडी’साठी स्टॉल वाटप प्रक्रिया अंतिम टप्प्यात
महिला बचतगटांना प्रोत्साहन आणि नवोदितांना हक्काचे व्यासपीठ या संकल्पनेतून आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी – 2023’ जत्रेकरिता तब्बल 7 हजारहून अधिक इच्छुक स्टॉलधारकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन लकी ड्रॉच्या माध्यमातून यापैकी 1 हजार स्टॉल वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जांची छाननी करण्याचे काम सुरू आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी म्हणून लौकिक प्राप्त ‘इंद्रायणी थडी’ जत्रेतील स्टॉल नोंदणीकरिता रविवारपर्यंत तब्बल 7 हजारहून अधिक इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून, तसेच शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन केले जाते. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहा शेजारी गावजत्रा मैदानावर दि. 25 जानेवारी ते दि. 29 जानेवारी 2023 दरम्यान पाच दिवस ही जत्रा होणार आहे. त्यासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यावर्षी जत्रेमध्ये एकूण 1 हजार स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ग्राम संस्कृती, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक दस्तावेज प्रदर्शन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती यासह नवोदित कलावंतांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्टॉल बुकिंगसाठी राज्यभरातून प्रतिसाद…
इंद्रायणी थडी जत्रेमध्ये सुमारे 40 प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अबलावृद्धांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता व्यासपीठ निर्माण केले आहे. स्पर्धेचे ब्रॅण्डिंग, प्रशस्तीपत्रक, बक्षिसे, प्रमुख पाहुणे यांचे नियोजन केले आहे. या स्पर्धांसाठी नामांकीत संस्थांनी नोंदणी केली आहे. तसेच, स्टॉल वाटप करण्यासाठी ऑनलाईन लकी ड्रॉ करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्टॉल मिळालेल्या अर्जदारांना आयोजकांकडून संपर्क करण्यात येईल. त्याद्वारे स्टॉल नंबर, हॉल नंबर, नियम आणि अटींबाबत सर्व माहिती स्टॉलधारकांना कळवण्यात येईल, असेही समन्वयक संजय पटनी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
एक हजार स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार असून, सतरा एकर जागेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित केला आहे. या महोत्सवाचा परिणाम चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराला मिळू शकतो. सदर कार्यक्रम त्वरित रद्द करण्यात यावा.
– सचिन काळभोर, सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *