महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ जानेवारी । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहे. विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Balasaheb Thackeray Birth Anniversary maharashtra politics CM Eknath Shinde )
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण होणार आहे.
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी क्षणोक्षणी मला बाळासाहेबांची आठवण येते. असं भावूक वक्तव्य केलं.
काय म्हणाले शिंदे?
बाळासाहेब यांचे योगदान केवळ राज्यात नव्हे तर जगभरात. बाळासाबेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते अनेक मोठ्या पदावर आहेत. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्तादेखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होत, त्यांच्याचमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी या राज्याच मुख्यमंत्री आहे. मला काम करण्याची संधी मिळाली.
मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सगळं काही योगदान त्यांचेच आहे. एकही क्षण जात नाही की त्यांची आठवण येत नाही. त्यांची जी काही शिकवण आहे. ती सर्वसामान्यांना न्याय देणारी आहे. त्यांच्या विचारांच्या आधारांवरच हे सरकार स्थापन करण्यात आलं आहे. अनेक निर्णय आम्ही जनतेच्या हिताचे घेतले आहेत.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्वांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी मी स्वत: बोललो असून हा सोहळा अतिशय भव्यदिव्य असा होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सांगितले.