महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ जानेवारी । तामिळनाडूमधील अरक्कोणम येथील मंडियाम्मन मंदिरात उत्सवादरम्यान क्रेन कोसळली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रेन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्सवात क्रेनचा वापर करण्यास परवानगी नव्हती.
ही घटना रविवारी सायंकाळची आहे. अरक्कोणम येथील मंडियाम्मन मंदिरात मायिलेरू उत्सव सुरू होता. यावेळी क्रेनला लटकून तिघेजण देवाच्या मूर्तीला हार घालत होते. त्यानंतर क्रेनचे नियंत्रण बिघडले आणि ती कोसळली.
नियंत्रण सुटल्याने क्रेन कोसळली
या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात तीन-चार लोक क्रेनला लटकलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात पुष्पहार आहेत, ते मूर्तींना हार घालण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान, नियंत्रण सुटल्याने क्रेन उलटली. या दुर्घटनेनंतर मंदिरात पळापळ सुरू होऊन चेंगराचेंगरी झाली आहे. काही लोकांनी क्रेनखाली दबलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.