ग्राहक प्रचंड संतापले ; 5G अजून काही मिळेना, कॉल ड्रॉप मात्र प्रचंड वाढले ; ट्रायने दिले निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । देशात ५ जी सेवा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झाली, तेव्हापासून ग्राहकांना अधिक सेवा मिळण्याची आशा असताना लाखो ग्राहकांना कॉल ड्रॉपचा सामना करावा लागत आहे. याचवेळी फोनवर बोलत असताना अचानक फोन बंद होण्यासह इंटरनेटची गती पहिल्यापेक्षा तुलनेत कमी झाल्याने ग्राहक प्रचंड संतापले आहेत.

देशात ५ जी सेवा १३० शहरांमध्ये पोहोचली आहे. मात्र, ग्राहकांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढला आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी तक्रार केल्यांतर दूरसंचार विभागाला अखेर जाग आली असून, ट्रायने अविरत आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. कंपन्यांनीही सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यानंतरही सेवा पूर्वरत होण्यासाठी अनेक महिने लागणार असल्याचे बोलले जाते.

५०-७० % कॉल ड्रॉप :
मोबाइलची विक्री वाढत असल्याने लोक ५ जीकडे वळत असल्याचे दिसून येते. मात्र, सेवा अचानक बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्राहक काय म्हणतात?
मोबाइल ग्राहकांना पूर्ण महिन्यासाठी अविरत सेवा हवी. एका महिन्याच्या रिचार्जसाठी मोठी रक्कम दिल्यानंतर त्यांना सेवा चांगलीच हवी आहे. सरकार सेवा कराच्या रूपात महसूल मिळवते. चांगली सेवा देणे हे सरकार, नियामक व कंपन्यांचे कर्तव्य आहे.

५०कोटी भारतीयांकडे आहे स्मार्टफोन
१०कोटी जणांकडे आहे ५जी स्मार्टफोन
२% कॉल ड्रॉपचे लक्ष्य ट्रायचे असताना भारतात ते ०४% अधिक आहे. जगभरात ते ०३% आहे.
केवळ १४ टक्के ग्राहक दूरसंचार कंपन्यांवर खूश आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *