सूर्यकुमार ठरला ICC मेन्स टी-20 प्लेयर ऑफ द इयर:हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय फलंदाज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । आयसीसीने भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. आयसीसीने त्याला वर्ष 2022 चा टी 20 क्रिकेटर ऑफ द इयर घोषित केलं आहे. तसंही ही घोषणा काही आश्चर्यकार घोषणा नाही. कारण सूर्यकुमार यादवने 2022 वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. तो आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये एका वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील दुसरा क्रिकेटर बनला होता.

सूर्यकुमार यादवने 2022 हे वर्ष गाजवले. त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 187.43 च्या जबरदस्त सरासरीने 1164 धावा केल्या. सरत्या वर्षात सूर्यकुमार यादव टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

टी 20 मध्ये वर्षात दोन शतके

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी 20 क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकण्याचा भीम पराक्रम केला होता. त्याने पहिले शतक हे इंग्लंडविरूद्ध ठोकले तर दुसरे न्यूझीलंडविरूद्ध ठोकले. सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी 20 क्रिकेटमध्ये दोन शतकांबरोबरच 9 अर्धशतके देखील ठोकली आहेत.

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी षटकारांचा देखील पाऊस पाडला होता. त्याने 68 षटकार मारले. एका वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.

ऑस्ट्रेलियात झालेला आयसीसी टी 20 वर्ल्डकप देखील त्याने गाजवला. भारताकडून खेळताना त्याने 6 डावात तीन अर्धशतके ठोकली. त्याने 60 ची सरासरी आणि 190 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा ठोकल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *