Pakistan Power Cut : संपूर्ण पाकिस्तान अंधारात ; उर्जा संकट गडद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ जानेवारी । पाकिस्तानातील उर्जा संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. खुद्द सरकारी अधिकाऱ्यांनीच या बाबतचा इशारा दिला आहे. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यामुळे कच्च्या तेलाची आयात करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. (Pakistan Power Cut)

उर्जा संकटाची झलक तेव्हा पाहण्यास मिळाली जेव्हा संपूर्ण पाकिस्तानात सोमवारी तब्बल १६ तास वीज ठप्प झाल्याने देशाला अवघी रात्र अंधारात काढावी लागली. तांत्रिक बिघाडामुळे हे घडल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले असले तरी NikkeiAsia.com या वेबसाइटने आपल्या विशेष अहवालात हे ब्लॅकआउट इंधनाच्या घटत्या पुरवठ्याशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. वेबसाइटने पाकिस्तान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, ‘सरकारच्या आदेशामुळे इंधनाची बचत करण्यासाठी वीज केंद्रे रात्री बंद असतात. सोमवारी सकाळी संयंत्रे सुरू करण्याचा प्रयत्न केला असता यंत्रणा ठप्प झाली होती. (Pakistan Power Cut)

कच्च्या तेलाचे व्यापारी आधीच इशारा देत आहेत. तेल कंपनी सल्लागार समितीने गेल्या १३ जानेवारीला अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवले होते. या संस्थेमध्ये तेल शुद्धीकरण, विपणन आणि पाइपलाइन कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत. कौन्सिलच्या पत्रात तेल उद्योगासमोर असलेल्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील बहुतांश समस्या आयात अडथळ्यांशी संबंधित आहेत. त्या पत्रात पाकिस्तानला दर महिन्याला ४.३ दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोल, २ दशलक्ष टन हायस्पीड डिझेल आणि ६.५ दशलक्ष टन कच्चे तेल आयात करावे लागते. याचे संपूर्ण बिल 1.3 अब्ज डॉलर्स इतके होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *