मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट, गुवाहाटीमध्ये जिथे सांगेल तिथे सह्या करत होतो, पण आता…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ जानेवारी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांनी ठाण्यात ( thane ) एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. सहा महिन्यात राज्यात मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( dcm devendra fadnavis ) यांनी अनेक विकासाची कामे सुरु केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी महत्वाची कामे हाती घेतली. गेल्या अडीच वर्षाच्या काळात जे काही बंद झाले होते त्याला पुन्हा चालना दिली.

विकासासोबत काही कल्चरल कार्यक्रमही व्हायला हवेत. राज्यभरातून मला बोलावणे येतात. पण बाहेर कुठेही स्वागत झाले तरी ठाण्याचे स्वागत लक्षात राहते. आमदार प्रताप सरनाईक यांनी एकट्यानेच संपूर्ण जिल्ह्याचा निधी घेतला आहे. पण, त्यांनी जी काही कामे सांगितली त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. गुवाहाटीला असताना जिथे सांगतील तिथे सह्या करत होतो. पण, आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही सामान्यांच्या प्रश्नासाठी सह्या करायला तयार असतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *