महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ जानेवारी । बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आज संपावर आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारलाय. राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या 700 शाखा आणि 13 हजार कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचा आरोप करत बॅंकेच्या व्यवस्थापनाने तातडीने कर्मचाऱ्यांची भरती करावी अशी मागणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी केलीय.