महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रतिबंधित भागात आता अधिक कडक बंधने लागू करण्यात येणार आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांना घराबाहेरच पडू दिलं जाणार नाही. लॉकडाऊन 4 मध्येही ही बंधने कायम राहणार आहेत.
यासंदर्भात पुणे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे कडक नियोजन सुरु आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी जीवनाश्यक साहित्य घरात आणून ठेवावे लागणार आहे.सध्या गल्लीबोळात पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे. प्रतिबंधित भागात भाजीपाला आणि अन्य विक्रेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.