महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – संभाजीनगर जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत चालला आहे. संभाजीनगर शहरात आज 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
संभाजीनगर शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.
शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंतच्या साडेतेरा तासांत या जीवघेण्या आजाराने तब्बल पाच जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे शहरात काेराेनामुळे बळींची संख्या ३१ वर गेली आहे. विशेष म्हणजे आजवर ४० वर्षांपुढील शहरातील रुग्णांचेच काेराेनामुळे बळी गेले, मात्र रविवारी पहिल्यांदाच सर्वात कमी वयाच्या म्हणजे ३२ वर्षीय तरुण व ३५ वर्षीय महिला रुग्णाचाही बळी गेला. मृतांमध्ये तीन पुरुष व दाेन महिलांचा समावेश आहे. गेल्या दाेन महिन्यांत गेलेल्या ३१ बळींपैकी २८ जणांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात 61 जणांना काेराेनाची लागण झाली यात घाटीतील निवासी डाॅक्टरसह महिला पाेलिसाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1021 झाली. तर दिवसभरात 32 जण काेराेनामुक्त झाले.