पहाटेच्या थपथविधीमागे हात आहे का? शरद पवार म्हणाले ………

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ जानेवारी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य केलं होतं. याबाबत शरद पवार यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली, आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र दिसत असल्याचं म्हणत त्यांनी निवडणूक सर्व्हेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली आहेत आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर दिली आहे. तसेच बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. कर्नाटकात लोक परिवर्तनासाठी इच्छूक आहेत. विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीही काहींशी बोललो आहे, महाविकास आघाडीने एकत्र निवडणुकीला सामोरे जावे अशी आमची भूमिका असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्या युतीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपाची अद्याप वेळ आलेली नाही. मात्र आमची आणि वंचित बहुजन आघाडीची अद्याप चर्चाच झाली नाही. आमच्या समोर कोणताही प्रस्ताव नाही मग चर्चा कशी करणार असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही दिल्लीत एकत्र येणार आहोत, त्यावेळी या सर्व गोष्टींवर चर्चा होईलच असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *