Fertility : ‘या’ सवयींमुळे पुरुषांमध्ये येते नपुंसकत्व ; हे उपाय करून पहा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ जानेवारी । एका अभ्यासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ज्यात आजच्या पुरुषांची प्रजनन क्षमता (Male sexual problems) झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आलंय. ज्याचं कारण शुक्राणूंची संख्या कमी असणे आहे. या मागे तुम्हाला असणारी वाईट सवयी. जर तुम्हालाही या सवयी असतील तर वेळीच सावध व्हा. 

धुम्रपान
जे पुरुष मोठ्या प्रमाणात धुम्रपान करतात त्यांना स्पर्म काऊंट कमी होण्याची समस्या उद्भवू शकते.

तणाव
ऑफिसचा वाढलेला तणावामुळे तुमच्या शुक्राणूंची संख्या कमी करु शकतात. सतत तणावात राहणं, कमी झोपणं, सतत टेन्शनमध्ये राहणं यामुळे तुमचा स्पर्म काऊंट कमी होतो.

व्यायामाचा अभाव
तासंतास खुर्चीवर बसून काम, त्यात व्यायामाचा अभाव…यामुळे पुरुषांमध्ये लठ्ठपणाची समस्या जाणवते. तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. जर पुरुषांना त्यांचं सेक्स लाइफ चांगलं हवं असेल तर दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

रात्री उशिरा झोपणं
रात्री उशिरा झोपल्यामुळे तणाव आणि लठ्ठपणाची समस्या वाढते. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. इतकंच नाही, तर रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते.

पॅन्टच्या खिशात मोबाईल ठेवणे
पुरुषांनी आपला मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते, असं एका अभ्यासात समोर आलं आहे. कारण मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेंजचा शुक्राणूंवर वाईट परिणाम होतो.

शुक्राणूंची संख्या वेगाने वाढेल
व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचं सेवन
शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचे सेवन करा. हे एक उत्तेजक आहे जे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्याचं काम करते.

अश्वगंधा
पुरुषांसाठी अश्वगंधा खूप फायदा होतो. हे एक सर्वोत्तम नैसर्गिक औषध आहे. दररोज पाच ग्रॅम अश्वगंधा सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

शिलाजीत
हे दुसरं एक औषध आहे, ज्यामुळे नपुंसकत्व टाळण्यासाठी उत्तम सप्लिमेंट आहे. जर तुमच्या शुक्राणूंची संख्या कमी होत असेल, तर शिलाजीतचे दिवसा सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

झिंक
झिंक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढविण्यास खूप फायदेशीर आहे. म्हणूनच स्त्रियांपेक्षा पुरुषांना त्याची जास्त गरज असते. झिंक हे पुरुषांच्या लैंगिक, प्रोस्टेट आणि टेस्टोस्टेरॉनच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

टीप ; येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *