![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । अजय विघे | वेळेत धान्य उपलब्धता होत नसल्यामुळे व ई-पॉस मशीनवर वितरणासाठी मागील महिन्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यास शासन स्तरावरून असमर्थता दर्शविन्यात आली असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे नियतन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे. सद्य स्थितीत शिल्लक अन्न धान्य उपलब्धता विचारात घेता एक महिन्याचे नियतनपेक्षा कमी आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेशी दूरध्वीद्वारे झालेल्या चर्चदरम्यान त्यांनी ई-पॉस मशीन वर ज्या महिन्याचे व योजनेचे पर्याय उपलब्ध आहेत त्या महिन्याचे व
योजनेचे धान्य दुकानात पोहच होणे अपेक्षित असल्याने तालुका निहाय परिस्थिती विचारात घेऊन ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे नियतन स्थगित करून थेट त्या पुढील महिन्याचे नियतन काढून वाहतूक करणे बाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.यामुळे लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुानदारांना सहकार्य करावे, नाहक त्रास देऊ नये, असे आवाहन कोपरगाव तहसीलदार यांनी केले आहे.