महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -मुंबई – विशेष प्रतिनिधी -कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक उद्योगांना सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात येत आहेत. मात्र प्रचंड अडचणीत असलेल्या हॉटेल इंडस्ट्रीला सरकारने कोणतीच मदत जाहीर केली नाही. प्रचंड रोजगार निर्माण होणारा हॉटेल उद्योग गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने हॉटेल इंडस्ट्रीला सरकारने तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
परदेशात मात्र हॉटेल इंडस्ट्रीला त्या त्या सरकाने मदत केली आहे. सरकारने हॉटेल इंडस्ट्रीला मदत केली नाही तर 35 टक्के रेस्टॉरंट कायस्वरूपी बंद होतील आणि 35 ते 38 टक्के बेरोजगारी वाढेल. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री वाचवण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे यासाठी ऑनलाइन पीटिशन दाखल करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली.