![]()
महाराष्ट्र २४- ऑनलाईन -पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के. महाजन. – कोरोना मुळे उदभव्लेल्या आर्थीक अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थीक पैकेज मधून लघू व मध्यम उद्योजकांच्या पदरात प्रोव्हीडंड फंड ची सवलत सोडली तर डायरेक्ट सवलत अशी काहीच नाही, जे काही आहे ते सर्व फिरुन फारुन आहे. लॉकडावून नंतर तीन महिन्या चे हप्ते पुढे ढकलन्यात आले होते. ते तिन महीने म्हणजे मार्च,एप्रिल व मे… हे तीन महीने संपण्यात आलेत. जुन महिन्या पासुन हप्ते सुरू होतील असे संदेश बँकां कडून यायला सुरुवात झाली आहे,
त्या मुळे लघू व मध्यम उद्योजक चिंतेत आहेत. कारण की उत्पन्नाचे स्तोत्र अजुन सुरू झाले नाहीत. अजुन तर पुर्णपणे उद्योगही सुरू जा झाले नाहीत त्या मुळे हप्ते भरायचे कसे असी चिंता सतावत आहे, म्हणून सरकारने गांभीर्याने विचार करुन लघू,मध्यम उद्योजकां ना व त्यांच्याशी निगडीत कामगार वर्गाला कर्जाचे तीन महिन्याचे व्याज माफ करावे व अजुन तीन मही हप्ते पुढे ढकलुंन दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे……..
केंद्र सरकारने 20 लाख करोड च्या आर्थीक पैकेज मधे लघू व मध्यम उद्योजकांना घेतलेल्या व्यावसायीक व घर कर्जांवर काहितरी व्याज माफ करतील अशी मोठी अपेक्षा होती, पण त्यात कर्ज काढून व्याज व हप्ते भरावेत म्हणून बिना गैरंटी, 4 वर्ष मुदती चे कर्जे मिळणार अशी सवलत आहे…….
नवीन कर्जा ची परत फेड 1 वर्षानी सुरू करावी अशी सवलत आहे….पण जुन्या कर्जाचे हप्ते जुन पासुन सुरु होणार आहेत ह्या कडे केंद्र सरकार चे लक्ष गेले नाही, त्या मुळे जुने कर्जदार चिंतेत आहेत….केंद्र सरकारने लक्ष दिले नाही म्हणून राज्य सरकारने तरी लघू व मध्यम उद्योजकां कडे लक्ष द्यावे व वरील मागणी मंजूर करावी अशी अपेक्षा आहे.