महाराष्ट्र २४- ऑनलाईन -लातूर – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज लातुर येथील ११ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले असून त्यापैकी २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले. लातुर मध्ये प्रथमच २ रुग्ण सापडले असल्याने लातुरची डोकेदुखी वाढली असून ते दोघेही मुंबई येथून प्रवास करून आलेले व्यक्ती आहेत. दरम्यान ९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
*उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथून आज एकूण ९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दुपारी येथील कोरोना बाधित ६५ वर्षीय रुग्णावर उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. त्यास उच्च रक्तदाब व मधुमेह हा हीआजार होता.
जळकोट येथील एका व्यक्तींचा स्वॅब तपाणीसाठी आला होता, तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बीड येथील २९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या २२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील २८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी २५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकुण ७८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ६२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन १६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर यांनी दिली.